पंतप्रधान कार्यालय

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वाहिली आदरांजली

Posted On: 16 AUG 2024 11:00AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

"अटलजींना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

राष्ट्रउभारणीत त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल अगणित लोकांच्या स्मरणात ते आहेत.आपल्या देशवासीयांना अधिक चांगले जीवन जगता यावे,यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले.भारतासाठी त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करत राहू.

'सदैव अटल' येथे आज सकाळी इतर मान्यवरांसोबत जाऊन त्यांना आदरांजली वाहिली."


S.Tupe/S.Kakade/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2045811) Visitor Counter : 34