पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या जागतिक नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले आभार

Posted On: 15 AUG 2024 10:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 ऑगस्ट 2024

 

भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा आणि शुभसंदेश पाठवणाऱ्या विविध जागतिक नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.

भूतानच्या पंतप्रधानांनी पाठवलेल्या ट्विट संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले:

“पंतप्रधान त्शेरिंग तोबग्ये, स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद.”

 

नेपाळच्या पंतप्रधानांनी पाठवलेल्या ट्विट संदेशाला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले:

“पंतप्रधान के.पी.शर्मा ओली, स्वातंत्र्यदिनानिमित्त तुम्ही पाठवलेल्या शुभेच्छांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. भारत आणि नेपाळ यांच्यातील मजबूत बंधनांबद्दल तुमच्याशी संपूर्णपणे सहमत आहे.”

 

मालदीवच्या राष्ट्रपतींनी पाठवलेल्या ट्विट संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले:

“आमच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तुम्ही पाठवलेल्या सदिच्छांबद्दल धन्यवाद, राष्ट्रपती मोहम्मद मुईझ्झू. भारत देश मालदीवला एक अनमोल मित्र समजतो आणि आपले देश आपल्या लोकांच्या भल्यासाठी एकत्र येऊन काम करत राहतील.”

 

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी पाठवलेल्या ट्विट संदेशाला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले:

“आमच्या स्वातंत्र्य दिनी व्यक्त केलेल्या शुभेच्छांबद्दल माझे चांगले मित्र असलेल्या राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे मी आभार मानतो.केवळ त्यांच्या भारत दौऱ्याच्या वेळीच नव्हे तर इतर अनेक प्रसंगी आमच्यात झालेल्या संवादांचे मी स्नेहपूर्वक स्मरण करतो. या संवादांनी भारत-फ्रान्स भागीदारीला मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदान केली आहे. जागतिक हितासाठी आपण एकत्र येऊन काम करत राहू.”

 

मॉरिशस पंतप्रधानांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले:

“स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छांसाठी पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांचे आभार. आपल्या राष्ट्रांमधील मैत्री अधिकाधिक वृध्दिंगत आणि बहुआयामी होत राहो.”

 

यूएई म्हणजेच संयुक्त अरब एमिरातचे पंतप्रधान  महामहिम मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्या पोस्टला प्रतिसादात्मक पोस्‍ट पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्‍यम –‘एक्स’  वर केली आहे; त्यामध्‍ये म्हटले आहे की:

"तुमच्या  शुभेच्छांबद्दल कृतज्ञ आहे @HHShkMohd. भारत आणि यूएई  यांच्यातील मजबूत संबंधांबद्दलची तुमची वैयक्तिक वचनबद्धता प्रशंसनीय आहे. आपले  देश वर्षानुवर्षे जोपासले गेलेले मैत्रीचे बंध अधिक  दृढ करत राहतील."

 

 

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छांना उत्तर देताना पंतप्रधान  मोदी यांनी समाज माध्‍यम ‘एक्स’ वर पोस्ट केले:

“स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण दिलेल्या  शुभेच्छांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.  PM @GiorgiaMeloni. भारत-इटली मैत्री वृध्दिंगत होत राहो आणि या  पृथ्‍वीग्रहाला अधिक  चांगले बनविण्यासाठी उभय देश योगदान देत राहोत.”

 

 

* * *

S.Patil/Sanjana/Suvarna/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2045750) Visitor Counter : 60