पंतप्रधान कार्यालय
भारतातील रामसर स्थळांच्या संख्येत वाढ झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले
प्रविष्टि तिथि:
14 AUG 2024 10:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2024
भारतातील रामसर स्थळांच्या संख्येत वाढ झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले आहे. रामसर ठरावा अंतर्गत मान्यता देण्यात आलेल्या रामसर स्थळांमध्ये आणखी तीन जागांची भर घालणाऱ्या तामिळनाडू आणि मध्यप्रदेश या राज्यांमधील जनतेची त्यांनी प्रशंसा केली आहे.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्र्यांच्या पोस्टला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी म्हटले आहे:
“आपल्याकडील रामसर स्थळांच्या संख्येत वाढ होत आहे, ही गोष्ट भारतासाठी निश्चितच आनंदाची असून, यामधून शाश्वत विकास आणि निसर्गाशी सुसंगत राहण्याला आम्ही दिलेले प्राधान्य अधोरेखित होते. मध्यप्रदेश आणि तामिळनाडूच्या जनतेचे विशेष अभिनंदन.
आगामी काळातही अशा प्रयत्नांमध्ये आपण आघाडीवर राहू.”
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2045483)
आगंतुक पटल : 109
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada