गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते अहमदाबादमध्ये 'तिरंगा यात्रेची' सुरुवात


हर घर तिरंगा मोहीम म्हणजे देशभक्तीची अभिव्यक्ती तसेच 2047 पर्यंत एक महान आणि विकसित भारत निर्माण करण्याच्या संकल्पाचे द्योतक होय

Posted On: 13 AUG 2024 10:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 ऑगस्ट 2024

 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज अहमदाबाद महानगरपालिकेद्वारे (एएमसी) अहमदाबादमध्ये आयोजित केलेल्या 'तिरंगा यात्रेची' सुरुवात झाली. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी सुरू केलेली हर घर तिरंगा मोहीम ही देशभक्तीची अभिव्यक्ती बनली असून 2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याचा संकल्पाचे  प्रतिक ठरली आहे  असे अमित शाह यांनी यावेळी नमूद केले.

  

अमित शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यामागे तीन उद्दिष्टे होती. देशातील प्रत्येक बालक, तरुण आणि नागरिकाला स्वातंत्र्यलढ्याच्या संपूर्ण इतिहासाचे स्मरण  देणे हे पहिले ध्येय होते. देशाने स्वातंत्र्याच्या 75 वर्षात केलेल्या कामगिरीची माहिती सर्व नागरिकांना, विशेषत: तरुण पिढीला देणे हे दुसरे ध्येय होते. भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत पुढील 25 वर्षे ‘अमृतकाळाच्या’ माध्यमातून देशाच्या विकासासाठी कार्य करून जगातील प्रत्येक क्षेत्रात भारताला अग्रेसर करण्याचा संकल्प  देशातील 140 कोटी नागरिकांनी घेणे हे तिसरे उद्दिष्ट होते.

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ नंतर ‘अमृतकाळात’ देशाला अग्रणी ठेवण्याच्या संकल्पाचे स्मरण करून देण्यासाठी दरवर्षी ‘हर घर तिरंगा यात्रा’ आयोजित केली जाते असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी निदर्शनास आणले. आज या निमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या अगणित हुतात्म्यांना आम्ही आदरांजली अर्पण करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या 10 वर्षात अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत ज्याने संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले आहे असेही अमित शाह यांनी उद्धृत केले.

अमित शहा म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू केली आहे. घर, कार्यालय, कारखाने इत्यादी ठिकाणी तिरंगा फडकावून आणि त्याच्यासोबत सेल्फी घेऊन आपण सर्वांनी या मोहिमेत सहभागी व्हायला हवे, असेही ते म्हणाले.

 

* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2045040) Visitor Counter : 55