पंतप्रधान कार्यालय

जागतिक सिंह दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

Posted On: 10 AUG 2024 9:03AM by PIB Mumbai

 

आज जागतिक सिंह दिन असून त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंह संवर्धन आणि संरक्षण कार्यात सहभागी असलेल्या सर्वांचे अभिनंदन केले.यावेळी  फेब्रुवारी 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या स्थापनेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या मंजुरीच्या निर्णयावर श्री मोदींनी प्रकाश टाकत  मार्जार कुळातील आकाराने मोठ्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी सरकारच्या असलेल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.यासाठी जगभरातून मिळालेल्या उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

पंतप्रधान मोदींनी सर्व वन्यजीव प्रेमींना गीर राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्याचे आणि सिंहाच्या संरक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांचे साक्षीदार होण्याचे तसेच गुजरातच्या लोकांचे  आदरातिथ्य अनुभवण्याचेही निमंत्रणही दिले.

आपल्या X वरील साखळी पोस्टमध्ये श्री मोदी म्हणाले:

जागतिक सिंह दिनानिमित्त, मी सिंह संवर्धनाचे  कार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि या मार्जार कुळातील भव्य  प्राण्यांचे संरक्षण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो.आपल्या सर्वांना माहीत आहे की, भारतात गीर, गुजरातमध्ये सिंहांची संख्या मोठी आहे.गेल्या काही वर्षांमध्ये त्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे, हे अभिमानास्पद वृत्त आहे.”

या वर्षी फेब्रुवारीमध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळाने मार्जार कुळातील भव्य प्राण्यांचे वास्तव्य असलेल्या जगातील सर्व राष्ट्रांना एकत्र आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची स्थापना करण्यास मान्यता दिली. शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी सर्वांगीण दृष्टीकोन तयार करण्याचा आणि या संदर्भात समुदायाच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न या मंचावरून केला जात.या प्रयत्नांना जागतिक स्तरावर अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे

मी आपणा सर्वांना, सर्व वन्यजीव प्रेमींना गीर राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्याचे निमंत्रण देतो.यामुळे सिंहाच्या संरक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांचे साक्षीदार होण्याची तसेच गुजरातच्या लोकांचे  आदरातिथ्य अनुभवण्याची सुसंधी आपल्या सर्वांना लाभेल.

***

JPS/S.Patgoankar/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2044017) Visitor Counter : 31