पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पिंगली वेंकय्या यांना जयंतीनिमित्त आदरांजली
हर घर तिरंगा चळवळीला पाठिंबा देण्याचे नागरिकांना कळकळीचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
02 AUG 2024 2:02PM by PIB Mumbai
पिंगली वेंकय्या यांच्या जयंतीनिमित्त, देशाला तिरंगी ध्वज देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे स्मरण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पिंगली वेंकय्या यांना आदरांजली अर्पण केली. हर घर तिरंगा चळवळीला पाठिंबा दर्शवण्यासाठी नागरिकांनी 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत तिरंगी झेंडा फडकावून आपापले सेल्फी काढून ते harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावेत, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना केले आहे.
आपल्या X वरील संदेशात पंतप्रधान म्हणाले,
“पिंगली वेंकय्या यांच्या जयंतीदिनी त्यांचे स्मरण करतो. आपल्याला तिरंगा ध्वज देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अविस्मरणीय आहेत. हर घर तिरंगा चळवळीला पाठींबा द्या, 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत तिरंगा ध्वज फडकवा आणि त्यासोबत काढलेला सेल्फी harghartiranga.com मार्फत सगळ्यांना पाठवण्यास विसरू नका!”
***
S.Patil/R.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2040711)
आगंतुक पटल : 110
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam