पंतप्रधान कार्यालय
आसामच्या चराईदेव मोईदामचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून आनंद आणि अभिमान व्यक्त
Posted On:
26 JUL 2024 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जुलै 2024
आसामच्या चराईदेव मोईदामचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद आणि अभिमान व्यक्त केला आहे. भारतासाठी ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचे मोदी म्हणाले.
चराईदेव येथील मोईदाम गौरवशाली अहोम संस्कृतीचे दर्शन घडवतात, जे पूर्वजांसाठी अत्यंत पूजनीय होते असे मोदी म्हणाले.
युनेस्को जागतिक वारसा यादीबद्दल युनेस्कोच्या उपरोक्त एक्स पोस्टला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
“भारतासाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब!
चराईदेव येथील मोईदाम गौरवशाली अहोम संस्कृतीचे दर्शन घडवतात, जे पूर्वजांसाठी अत्यंत पूजनीय होते. मला आशा आहे की जास्तीत जास्त लोक महान अहोम साम्राज्य आणि संस्कृतीबद्दल जाणून घेतील.
मोइदाम #WorldHeritage List मध्ये समाविष्ट झाल्याचा आनंद आहे.”
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2037508)
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam