पंतप्रधान कार्यालय
25 व्या कारगिल विजय दिनानिमित्त 26 जुलै रोजी पंतप्रधान कारगिलला भेट देणार
शिंकून ला या लष्करी बोगद्याच्या कामासाठी सुरुंगाची शुभारंभी वात पंतप्रधान लावणार
या प्रकल्पामुळे लेह भागात सर्व मोसमात संपर्क कायम राहील
बोगद्याचे काम पूर्ण झाल्यावर हा जगातील सर्वाधिक उंचीवरील बोगदा ठरेल
Posted On:
25 JUL 2024 12:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जुलै 2024
25व्या कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलै रोजी सकाळी 9.20 च्या सुमारास कारगिल युध्द स्मारकाला भेट देऊन देशसेवेसाठी कर्तव्यावर असताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहणार आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते आभासी पद्धतीने शिंकून ला या लष्करी बोगद्याच्या कामासाठी सुरुंगाची शुभारंभी वात लावली जाईल.
शिंकून ला बोगदा प्रकल्पाअंतर्गत निमु-पदुम-दारचा मार्गावर सुमारे 15,800 फुट उंचीवर 4.1 किमी लांबीचा ट्वीन-ट्यूब बोगदा उभारण्यात येणार आहे. या बोगद्यामुळे लेह भागाशी वर्षभरात कोणत्याही मोसमात संपर्क कायम राखण्याची सोय होणार आहे. शिंकून ला बोगदा आपल्या सशस्र दलांच्या तसेच लष्करी सामग्रीच्या जलद आणि कार्यक्षम वाहतुकीची खात्रीशीर सोय होणार असून त्याबरोबरच लडाख परिसरातील आर्थिक आणि सामाजिक विकासाला देखील चालना मिळेल.
S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2036669)
Read this release in:
Kannada
,
Hindi
,
Hindi_MP
,
Punjabi
,
Tamil
,
Malayalam
,
Assamese
,
Bengali
,
Odia
,
English
,
Urdu
,
Manipuri
,
Gujarati
,
Telugu