अर्थ मंत्रालय

सरकारने नवीन करप्रणाली अधिक आकर्षक बनविली


प्रमाणित वजावट ₹ 50,000 वरून ₹ 75,000 पर्यंत वाढली

पगारदार कर्मचारी ₹ 17,500 पर्यंत बचत करू‌ शकतो

Posted On: 23 JUL 2024 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 जुलै 2024

 

पगारदार व्यक्ती आणि निवृत्तीवेतनधारकांना कर सवलत देण्यासाठी अनेक आकर्षक लाभ केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2024-25 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना जाहीर केले.

वित्तमंत्र्यांनी पगारदार कर्मचाऱ्यांसाठी प्रमाणित वजावट ₹50,000 वरून ₹75,000 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला.  तसेच नवीन कर प्रणाली अंतर्गत निवृत्तीवेतनधारकांसाठी कौटुंबिक निवृत्तीवेतनावरील वजावट ₹15,000 वरून ₹25,000 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.  यामुळे सुमारे चार कोटी पगारदार व्यक्ती आणि निवृत्तीवेतनधारकांना दिलासा मिळणार आहे.

श्रीमती सीतारामन यांनी नवीन करप्रणालीमध्ये कर दर संरचनेत पुढीलप्रमाणे सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला:

या बदलांचा परिणाम म्हणून, नवीन कर प्रणालीमध्ये पगारदार कर्मचारी वार्षिक ₹ 17,500 पर्यंतचा प्राप्तिकर वाचवू शकतो.

 

* * *

JPS/N.Mathure/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2036038) Visitor Counter : 20