अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर कार्यक्रमाअंतर्गत गुंतवणुकीसाठी तयार असे बारा “प्लग अँड प्ले” औद्योगिक पार्क्स विकसित केले जातील: केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25


देशांतर्गत उत्पादनासाठी महत्वपूर्ण खनिज मोहिमेअंतर्गत महत्वपूर्ण खनिजांचे पुनर्वापर आणि महत्वपूर्ण खनिज मालमत्तेचे परदेशात अधिग्रहण प्रस्तावित

कामगारांसाठीच्या सेवांच्या विस्तृत श्रेणीसाठी एकाच ठिकाणी सर्व सेवा मिळाव्यात या हेतूने ई-श्रम पोर्टलचे इतर पोर्टलसह एकत्रीकरण

उद्योग आणि व्यापारासाठी मान्यता मिळवणे सोपे करण्याच्या उद्दिष्टाने सुधारित श्रमसुविधा आणि समाधान पोर्टल्सचा प्रस्ताव 2024-25 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे

Posted On: 23 JUL 2024 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 जुलै 2024

 

"आमचे सरकार शहर नियोजन योजनांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करून, राज्ये आणि खाजगी क्षेत्र यांच्या भागीदारीने, 100 शहरांमध्ये किंवा जवळपासच्या भागात पूर्ण पायाभूत सुविधांनी युक्त  आणि गुंतवणुकीसाठी तयार असलेले "प्लग अँड प्ले" औद्योगिक पार्क्स विकसित करेल ." असा प्रस्ताव केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री, निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2024-25 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात मांडला आहे.

 

महत्वपूर्ण खनिजे मोहीम

‘उत्पादन आणि सेवा’ क्षेत्राला अधिक प्राधान्य देत, केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये देशांतर्गत उत्पादन, ग खनिजांचे पुनर्वापर आणि महत्वपूर्ण खनिज मालमत्तेचे परदेशात अधिग्रहण  यासाठी एक महत्वपूर्ण खनिज मोहीम स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठीच्या निर्देशांमध्ये तंत्रज्ञान विकास, कुशल मनुष्यबळ, विस्तारित उत्पादक जबाबदारी संरचना आणि योग्य वित्तपुरवठा यंत्रणा यांचा समावेश असेल.

श्रम संबंधित सुधारणा

केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये रोजगार आणि कौशल्य यासह कामगारांसाठी विस्तृत सेवांच्या तरतुदी सुलभ करण्याचा प्रस्ताव आहे. "इतर पोर्टल्ससह ई-श्रम पोर्टलचे सर्वसमावेशक एकत्रीकरण अशा एकाच ठिकाणी मिळणाऱ्या सेवांसाठी लाभदायक ठरेल." असा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी मांडला आहे.

'नव्या पिढीतील सुधारणां' वर लक्ष केंद्रित करून केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये उद्योग आणि व्यापारासाठी मान्यता सुलभ करण्यासाठी श्रम सुविधा आणि समाधान पोर्टल्सना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे,  विकसित भारतच्या ध्येयाकडे आपला  प्रवास अधिक जलद गतीने होण्यासाठी त्यांची अंमलबजावणी सर्वव्यापी करण्याचे उद्दिष्ट आहे.

 

* * *

NM/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2036034) Visitor Counter : 79