पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान मोदी यांनी केले के. पी. शर्मा ओली यांचे नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्त झाल्याबद्दल अभिनंदन

Posted On: 15 JUL 2024 11:39AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज के. पी. शर्मा ओली यांचे नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्त झाल्याबद्दल अभिनंदन केले. 

 

भारत आणि नेपाळ यांच्यात असलेले मैत्रीचे अतिशय घनिष्ठ संबंध आणखी बळकट होतील आणि परस्परांना फायदेशीर असलेल्या सहकार्याचा आणखी विस्तार होईल, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली.  

मोदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले:

“ नेपाळचे पंतप्रधान म्हणून तुमची नियुक्ती झाल्याबद्दल @kpsharmaoli तुमचे हार्दिक अभिनंदन. आपल्या दोन्ही देशांदरम्यान असलेले मैत्रीचे अतिशय घनिष्ठ संबंध आणखी बळकट होतील आणि आपल्या जनतेच्या प्रगती आणि समृद्धीसाठी परस्परांना फायदेशीर असलेल्या सहकार्याचा आणखी विस्तार होईल, अशी मला आशा आहे.

 @PM_nepal_”

***

HarshalA/ShaileshP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2033278) Visitor Counter : 29