पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी ऑस्ट्रियन इंडोलॉजिस्टची घेतली भेट
Posted On:
10 JUL 2024 10:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जुलै 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चार आघाडीच्या ऑस्ट्रियन इंडोलॉजिस्ट आणि भारतीय इतिहास आणि विचारांच्या विद्याप्रचुरकांची भेट घेतली. त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि भाषातज्ञ डॉ. बिर्गिट केलनर; आधुनिक दक्षिण आशियाचे अभ्यासक प्रा. मार्टिन गेंस्ले; व्हिएन्ना विद्यापीठातील दक्षिण आशियाई अभ्यासाचे प्राध्यापक डॉ.बोरायिन लारियोस; आणि व्हिएन्ना विद्यापीठातील भारतीय विद्या विभागाचे प्रमुख डॉ. करिन प्रिसेंडान्झ यांच्याशी संवाद साधला.
पंतप्रधानांनी भारतीय विद्या आणि भारतीय इतिहास, तत्त्वज्ञान, कला आणि संस्कृतीच्या विविध पैलूंवर विद्वानांशी विचार विनिमय केला. त्यांनी ऑस्ट्रियातील इंडोलॉजीची मुळे आणि त्याचा बौद्धिक कुतूहल आणि विद्वत्ता यावर झालेला परिणाम याविषयी माहिती घेतली. चर्चेत, विद्वानांनी भारतासोबतच्या त्यांच्या शैक्षणिक आणि संशोधन कार्याबद्दल अवगत केले.
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2032280)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam