पंतप्रधान कार्यालय
परमपूज्य दलाई लामा यांच्या 89 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
06 JUL 2024 8:56PM by PIB Mumbai
परमपूज्य दलाई लामा यांच्या 89 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. परमपूज्य दलाई लामा यांच्यावर नुकत्याच झालेल्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी कामनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. परमपूज्य दलाई लामा यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केली आहे.
परमपूज्य दलाई लामा यांना शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश;
“परमपूज्य @DalaiLama यांच्या 89 व्या वाढदिवसानिमित्त त्यांना माझ्याकडून शुभेच्छा दिल्या आहेत. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर ते लवकर बरे व्हावेत, त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच माझी प्रार्थना आहे.”
***
S.Patil/T.Pawar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2031336)
आगंतुक पटल : 113
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam