पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या जून 2024 च्या भागासाठी मागवल्या कल्पना आणि सूचना

Posted On: 18 JUN 2024 5:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जून 2024

निवडणुकीमुळे आलेल्या अल्पशा विरामानंतर आकाशवाणीवर येणाऱ्या मन की बात कार्यक्रमाच्या आगामी भागाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. या महिन्यात 30 जून रोजी मन की बात कार्यक्रम निर्धारित केला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे.

नागरिकांनी मन की बात च्या 111 व्या भागासाठी आपले विचार आणि सूचना MyGov खुला मंच  किंवा NaMo ॲपवर पाठवाव्यात किंवा 1800 11 7800 या क्रमांकावर ध्वनिमुद्रित कराव्यात, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.

पंतप्रधानांनी एक्स पोस्ट वर म्हटले आहे :

निवडणुकांमुळे गेल्या काही महिन्यांत आलेल्या खंडानंतर #मन की बात आता परत येत आहे, हे सांगताना मला आनंद होत आहे. या महिन्याचा कार्यक्रम रविवार, 30 जून रोजी होणार आहे. यासाठी तुमचे विचार आणि सूचना पाठवण्याचे आवाहन मी तुम्हा सर्वाना करतो. MyGov ओपन फोरम किंवा नमो पवर तुमचे विचार लिहून पाठवा किंवा 1800 11 7800 या क्रमांकावर तुमचा संदेश ध्वनिमुद्रित करा.

N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2026217) Visitor Counter : 45