रेल्वे मंत्रालय
केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कार्यभार स्वीकारला
रेल्वेला किफायतशीर आणि सोयीस्कर वाहतुकीचे साधन बनवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोन आहे – अश्विनी वैष्णव
प्रविष्टि तिथि:
11 JUN 2024 4:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2024
केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज रेल भवन येथे कार्यभार स्वीकारला. रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जया वर्मा सिन्हा, तसेच वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांचे रेल भवन येथे स्वागत केले.

माध्यमांशी बोलताना वैष्णव यांनी पंतप्रधान मोदी यांनी आखलेला दीर्घकालीन दृष्टिकोन साकार करण्याप्रति अतूट वचनबद्धता अधोरेखित केली. त्यांनी सांगितलं की "पंतप्रधान मोदी यांचा रेल्वेशी एक विशेष भावनिक संबंध आहे आणि त्यांनी भारतीय रेल्वे सर्वसामान्य जनतेसाठी किफायतशीर आणि सोयीस्कर वाहतुकीचे साधन राहील यासाठी त्यांचा दृष्टिकोन पुढे नेण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे."

S.Kane/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2024177)
आगंतुक पटल : 127
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam