पंतप्रधान कार्यालय

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 3 कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी घरे कोट्यवधी भारतीयांसाठी ‘राहणीमानात सुलभता’ आणि प्रतिष्ठेला चालना देणारी: पंतप्रधान

Posted On: 10 JUN 2024 9:54PM by PIB Mumbai
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 3 कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी घरांचा निर्णय आपल्या देशाच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाला चांगल्या दर्जाचे जीवन जगण्याची खात्री करण्यासाठी सरकारची बांधिलकी अधोरेखित करतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 
 
एक्स या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले:
 
कोट्यवधी भारतीयांसाठी ‘राहणीमानात सुलभता’ आणि सन्मानाला चालना!
 
केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री आवास योजनेचा आणखी विस्तार करून 3 कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आपल्या देशाच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाला चांगल्या दर्जाचे जीवन जगण्याची खातरजमा करण्यासाठी सरकारची बांधिलकी अधोरेखित करतो. पीएमएवाय चा विस्तार हा सर्वसमावेशक वाढ आणि सामाजिक कल्याणासाठी आमच्या सरकारची वचनबद्धता देखील दर्शवतो."
***
 
JPS/VJ/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2023933) Visitor Counter : 57