पंतप्रधान कार्यालय
निवडणुकीत पुन्हा ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले अभिनंदन
'होरायझन 2047' कृती आराखड्यावर एकत्र काम करत राहण्यास उभय नेत्यांची सहमती
डी-डेच्या 80 व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा
आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
06 JUN 2024 4:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जून 2024
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज दूरध्वनीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला.
राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी पंतप्रधानांचे निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन केले आणि सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे आभार व्यक्त केले आणि भारत आणि फ्रान्समधील मजबूत आणि विश्वासार्ह धोरणात्मक भागीदारी आगामी काळात नवीन उंची गाठण्यासाठी सज्ज असल्याचे अधोरेखित केले.
'होरायझन 2047' कृती आराखड्यातील बांधिलकीच्या पूर्ततेसाठी एकत्र काम करत राहण्यास उभय नेत्यांनी सहमती दर्शवली.
डी-डेच्या ऐतिहासिक 80 व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना शुभेच्छा दिल्या.
आगामी पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
दोन्ही नेत्यांनी संपर्कात राहण्याबाबत सहमती दर्शवली.
* * *
S.Kane/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2023203)
Visitor Counter : 70
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam