पंतप्रधान कार्यालय
युरोपीय संघाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी पंतप्रधानपदी पुन्हा निवडून आल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे केले अभिनंदन
जागतिक कल्याणासाठी भारत-युरोपीय संघ धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा पंतप्रधान मोदी यांनी केला पुनरुच्चार
युरोपीय संसदेच्या निवडणुकीसाठी पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
06 JUN 2024 3:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जून 2024
युरोपीय संघाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपदी पुन्हा निवडून आल्याबद्दल दूरध्वनी करून अभिनंदन केले.
अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी पंतप्रधानांना लोकसभा निवडणुकीतील यश आणि त्यांच्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या, ऐतिहासिक कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. भारतीय लोकशाही आणि जगातील सर्वात मोठ्या निवडणूक प्रक्रियेची त्यांनी प्रशंसा केली.
पंतप्रधानांनी अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांच्या शुभेच्छांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि भारत व युरोपीय संघ यांच्यातील समान मूल्ये व तत्त्व अधोरेखित केली. भारत – युरोपीय संघाच्या भागीदारीला यंदा २० वर्षे पूर्ण होत असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले आणि दोहोंमधील ही भागीदारी जगाच्या भल्यासाठी आणखी बळकट करण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचा पुनरुच्चार केला.
युरोपीय संसदेच्या आजपासून सुरू होत असलेल्या निवडणुकांसाठी पंतप्रधानांनी उर्सुला वॉन डेर लेयेन यांना शुभेच्छा दिल्या.
* * *
S.Kane/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2023165)
आगंतुक पटल : 118
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Khasi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam