पंतप्रधान कार्यालय
निवडणुकीत पुन्हा विजयी ठरल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केले अभिनंदन
पंतप्रधान म्हणाले की हा लोकशाहीचा आणि लोकशाहीवादी विश्वाचा विजय आहे
जगाच्या कल्याणासाठी भारत-अमेरिका भागीदारी अधिक दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत
एकमेकांच्या संपर्कात राहण्यावर उभय नेत्यांची सहमती
प्रविष्टि तिथि:
05 JUN 2024 11:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जून 2024
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आर. बायडेन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला.
ऐतिहासिक पद्धतीने तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून निवडून आल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे आभार मानताना पंतप्रधान मोदी म्हणाले की हा लोकशाहीचा आणि लोकशाहीवादी विश्वाचा विजय आहे.
जगाच्या कल्याणार्थ भारत- अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी यापुढील काळात प्रयत्न सुरु ठेवण्यासाठी दोन्ही नेत्यांनी अनुमोदन दिले.
सध्या सुरु असलेल्या आयसीसी टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे सह-यजमानपद यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना शुभेच्छा दिल्या.
दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्यास मान्यता दिली.
* * *
JPS/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2023117)
आगंतुक पटल : 101
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam