पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा निवडणूक जिंकल्याबद्दल युकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यांचे अभिनंदन केले
भारत-युके व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट करण्यासंदर्भातील वचनबद्धतेला पंतप्रधान मोदी यांच्यातर्फे दुजोरा
युके येथे होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
05 JUN 2024 10:05PM by PIB Mumbai
युकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला.
भारतात नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान सुनक यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पंतप्रधानपदाच्या ऐतिहासिक अशा तिसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान सुनक यांच्या शुभेच्छांबद्दल आभार व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांनी विविध क्षेत्रांतील भारत-युके व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी प्रयत्न करत राहण्याबाबतच्या त्यांच्या वचनबद्धतेला दुजोरा दिला.
युके येथे होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी पंतप्रधानांनी सुनक यांना शुभेच्छा दिल्या.
***
JPS/SC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2023024)
आगंतुक पटल : 118
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam