अर्थ मंत्रालय
सीबीआयसीने हितधारकांकडून ‘केंद्रीय उत्पादन शुल्क विधेयक, 2024’ च्या मसुद्यावर 26 जून 2024 पर्यंत पूर्व-निर्धारित नमुना स्वरुपात सूचना मागवल्या
Posted On:
04 JUN 2024 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जून 2024
केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अखत्यारीतील केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) सर्व संबंधित हितधारकांकडून ‘केंद्रीय उत्पादन शुल्क विधेयक, 2024’ च्या मसुद्यावर 26 जून 2024 पर्यंत सूचना मागवल्या आहेत.
सीबीआयसीने ‘केंद्रीय उत्पादन शुल्क विधेयक, 2024’ चा मसुदा तयार केला असून व्यवहारात अमलात आणल्यानंतर हे विधेयक केंद्रीय उत्पादन शुल्क कायदा, 1944 ची जागा घेईल. व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन तसेच जुन्या आणि अनावश्यक तरतुदींचा पुनर्विचार यावर अधिक भर देत एक सर्वसमावेशक आणि आधुनिक केंद्रीय उत्पादन शुल्क कायदा लागू करणे हा या विधेयकाचा उद्देश आहे. सदर विधेयकात 12 प्रकरणे, एकशे चौदा खंड आणि दोन परिशिष्टांचा समावेश आहे.
विधिमंडळ -पूर्व सल्लागार प्रक्रियेचा भाग म्हणून ‘केंद्रीय उत्पादन शुल्क विधेयक, 2024’ चा मसुदा सीबीआयसीच्या https://www.cbic.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला असून त्यावर सर्व हितधारकांकडून खालील नमुन्यात येत्या 21 दिवसांच्या आत सूचना मागवण्यात आल्या आहेत:
सूचना/ टिप्पण्या/ मते पाठवण्यासाठीचा नमुना
अनु. क्र.
|
मसुदा विधेयकाचा कलम क्र.
|
कलम शीर्षक
|
प्रस्तावित दुरुस्ती असल्यास
|
कारणे/सूचना/टिप्पणी
|
|
|
|
|
|
विधेयकाच्या मसुद्यावरील उपरोल्लेखित नमुन्याच्या स्वरुपातील सूचना/टिप्पण्या इमेलद्वारे एमएसवर्ड (किंवा कोणत्याही सुसंगत स्वरुपात) अथवा मशीन रीडेबल पीडीएफ स्वरुपात cx.stwing[at]gov[dot]in यावर पाठवाव्यात.
* * *
S.Kane/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2022744)
Visitor Counter : 123
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam