भारतीय निवडणूक आयोग

लोकसभा निवडणुकीच्या उद्या (13 मे 2024) होणार असलेल्या  चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण


व्याप्ती: लोकसभेच्या 96 जागा, 17.7 कोटी मतदार, 1.92 लाख मतदान केंद्रे, 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेश

आंध्र प्रदेशातील विधानसभेच्या 175 जागा आणि ओदिशा विधानसभेच्या 28 जागांसाठीही या टप्प्यात मतदान होणार.

मतदानाच्या दिवशी उष्णतेच्या लाटेचा अंदाज नाही;  सामान्य ते सामान्य तापमानापेक्षा कमी (±2 अंश) तापमानाचा अंदाज

मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी तेलंगणमध्ये मतदानाची वेळ वाढवली.

Posted On: 12 MAY 2024 3:43PM by PIB Mumbai

 

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत  उद्या (13 मे 2024) होणार असलेल्या  चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी सर्व तयारी  पूर्ण झाली असून केंद्रीय निवडणूक आयोग सज्ज  आहे. या चौथ्या टप्प्यात, 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील (9 राज्ये + 1 केंद्रशासित प्रदेश) 96 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होईल. बरोबरीने एकाचवेळी आंध्र प्रदेशातील विधानसभेच्या 175 जागा आणि ओदिशा विधानसभेच्या 28 जागांसाठीही या टप्प्यात मतदान होणार आहे. तेलंगणातील 17 लोकसभा मतदारसंघांतील काही विधानसभा क्षेत्रातल्या मतदानाची वेळ(सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत), मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी आयोगाने वाढवली आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभाग-आयएमडीच्या अंदाजानुसार चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी मतदानाच्या दिवशी उष्णतेच्या लाटेची शक्यता नसून चिंतेचे कारण नाही. चौथ्या टप्प्यातील या मतदारसंघांमध्ये सामान्य ते सामान्य तापमानापेक्षा कमी (±2 अंश) तापमानाचा अंदाज, हवामान विभागाने वर्तवला आहे.मात्र, मतदारांच्या सोयीसाठी सर्व मतदान केंद्रांवर पाणी, शामियाना, पंखे आदी सुविधांसह चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

सध्या, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत, 20 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 283 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडले आहे. सर्व टप्प्यांची मिळून एकत्रित मतमोजणी 4 जून रोजी  होणार आहे.

चौथ्या टप्प्याची वस्तुस्थितीजन्य माहिती:-

1. लोकसभेची सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या चौथ्या टप्प्यात 10 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशातील 96 लोकसभा मतदारसंघांसाठी (अनारक्षित-64; अनुसूचित जमाती- 12; अनुसूचित जाती-20) 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे.  मतदान सकाळी 7 वाजता सुरु होऊन संध्याकाळी 6 वाजता संपेल. (मतदान बंद होण्याची वेळ मतदारसंघनिहाय वेगळी असू शकते)

2.     या चौथ्या टप्प्यात लोकसभेच्या जागांसह आंध्र प्रदेशातील विधानसभेच्या 175 जागा (अनारक्षित-139; अनुसूचित जमाती-7; अनुसूचित जाती-29) आणि ओदिशा विधानसभेच्या 28 जागांसाठी (अनारक्षित-11; अनुसूचित जमाती-14; अनुसूचित जाती-3) 13 मे रोजी एकाच वेळी मतदान होणार आहे.

3.       लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या चौथ्या टप्प्यात 10 राज्य/केंद्रशासित प्रदेश मिळून 1717 उमेदवार रिंगणात आहेत. चौथ्या टप्प्यातील प्रत्येक मतदारसंघात सरासरी 18 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

4.     चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेकरता निवडणूक आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची ने-आण करण्यासाठी  तीन राज्यांमध्ये (आंध्र प्रदेश -02, झारखंड- 108, ओदिशा -12) 122 हवाई फेऱ्या करण्यात आल्या आहेत.

5.     सुमारे 1.92 लाख मतदान केंद्रांवर 19 लाख मतदान अधिकारी सुमारे 17.7 कोटी मतदारांचे स्वागत करतील.

6.     सुमारे 17.70 कोटी मतदारांमध्ये 8.97 कोटी पुरुष आणि 8.73 कोटी महिला मतदारांचा समावेश 

7.     चौथ्या टप्प्याच्या मतदानात 85 वर्षांहून अधिक वयाचे 12.49 लाख मतदार तर 19.99 लाख नोंदणीकृत दिव्यांग मतदार असून सुविधेसाठी त्यांना घरून मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. घरून मतदान करण्याच्या पर्यायी व्यवस्थेची याआधीच मोठ्या प्रमाणावर प्रशंसा होत असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

8.    सार्वत्रिक निवडणुका 2024  च्या चौथ्या टप्प्यासाठी 364 निरीक्षक (126 सामान्य निरीक्षक, 70 पोलीस निरीक्षक, 168 व्यय निरीक्षक ) मतदानाच्या एक दिवस आधीच त्यांच्या मतदारसंघात पोहोचले आहेत. सर्वोच्च दक्षता घेण्याच्या दृष्टीने ते काळजीपूर्वक सेवा बजावतील.  याशिवाय, काही राज्यांमध्ये विशेष निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

9.     मतदारांना कोणतेही आमिष देण्यात येऊ नये यासाठी एकूण 4661 भरारी पथके, 4438 अचल निरीक्षण पथके, 1710 व्हिडीओ निरीक्षण पथके आणि 934 व्हिडीओ दर्शक पथके 24 तास काटेकोर आणि त्वरित कृती करण्याच्या उद्देशाने पाळत ठेवणार आहेत.

10.   एकूण 1016 आंतरराज्यीय आणि 121 आंतरराष्ट्रीय सीमा तपासणी नाके दारू, अंमली पदार्थ, रोख रक्कम आणि मोफत वस्तूंच्या कोणत्याही अवैध वाहतुकीवर कडक नजर ठेवून आहेत. सागरी आणि हवाई मार्गांवर कडक पाळत ठेवण्यात आली आहे

11.   वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींसह प्रत्येक मतदार सहजतेने मतदान करू शकतील याची योग्य तजवीज करण्यासाठी पाणी, उन्हापासून बचावासाठी शेड , स्वच्छतागृहे, रॅम्प , स्वयंसेवक, व्हीलचेअर  आणि वीज यासारख्या आवश्यक किमान सुविधा उपलब्ध आहेत.

12.   सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात आले आहे. या चिठ्ठ्या सोयीचे उपाय म्हणून तसेच आयोगाच्या वतीने येऊन मतदान करण्याचे निमंत्रण पत्र म्हणून काम करतात.

13.   मतदार या लिंकद्वारे त्यांच्या मतदान केंद्राचा तपशिल, आणि निवडणुकीची तारीख तपासून घेऊ शकतात

https://electoralsearch.eci.gov.in/

14.   आयोगाने मतदान केंद्रांवर ओळख पडताळणीसाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) व्यतिरिक्त 12 पर्यायी दस्तऐवजांना देखील मान्यता दिली आहे. मतदार यादीत मतदाराची नोंद असल्यास यापैकी कोणताही दस्तावेज दाखवून मतदान करता येईल. पर्यायी ओळख दस्तऐवजांसाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशाची लिंक:

https://www.eci.gov.in/eci-backend/public/api/download?url=LMAhAK6sOPBp%2FNFF0iRfXbEB1EVSLT41NNLRjYNJJP1KivrUxbfqkDatmHy12e%2FzBiU51zPFZI5qMtjV1qgjFsi8N4zYcCRaQ2199MM81QYarA39BJWGAJqpL2w0Jta9CSv%2B1yJkuMeCkTzY9fhBvw%3D%3D

15. लोकसभा 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांमधील मतदानाची समग्र माहिती खालील लिंकवर उपलब्ध आहे:

https://old.eci.gov.in/files/file/13579-13-pc-wise-voters-turn-out/

16.   मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यापासून मतदार संख्येसाठीचे मतदान ॲप प्रत्येक टप्प्यासाठी एकूण अंदाजित मतदान प्रत्यक्ष प्रदर्शित करण्याच्या नवीन वैशिष्ट्यासह अद्ययावत केले गेले आहे. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की टप्पानिहाय/राज्यनिहाय/विधिमंडळ मतदारसंघ निहाय/संसदीय  मतदारसंघ निहाय अंदाजित मतदानाची समग्र माहिती व्होटर टर्न आऊट ॲपवर मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दर दोन तासांच्या अंतराने उपलब्ध असते   आणि त्यानंतर  मतदान केंद्र अधिकाऱ्यांच्या आगमनानंतर सातत्याने अद्ययावत केली जाते.

***

S.Kane/A.Save/S.Naik/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2020375) Visitor Counter : 480