भारतीय निवडणूक आयोग
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून सिम्बॉल लोडिंग युनिट्सच्या हाताळणी आणि साठवणीसाठी भारतीय निवडणूक आयोगाचे निर्देश
प्रविष्टि तिथि:
01 MAY 2024 6:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 मे 2024
वर्ष 2023 च्या रिट याचिका (सिव्हिल) क्रमांक 434 मध्ये दिनांक 26 एप्रिल, 2024 रोजी भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने, भारतीय निवडणूक आयोगाने सिम्बॉल लोडिंग युनिट (एसएलयू) च्या हाताळणी आणि साठवणीसाठी नवीन नियमावली जारी केली आहे. एसएलयू च्या हाताळणी आणि साठवणीकरिता नवीन नियमावली लागू करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि तरतुदी तयार करण्याचे निर्देश सर्व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सुधारित नियमावली 01.05.2024 रोजी किंवा त्यानंतर हाती घेतलेल्या व्हीव्हीपॅट मध्ये चिन्ह लोडिंग प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सर्व प्रकरणांमध्ये लागू आहे.
मानक कार्यप्रणाली/सूचना पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा:
https://www.eci.gov.in/eci-backend/public/api/download?
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2019354)
आगंतुक पटल : 159
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Gujarati
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam