भारतीय निवडणूक आयोग
लोकसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राजपत्रित अधिसूचना 12 एप्रिल 2024 रोजी जारी होणार
12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 94 लोकसभा मतदारसंघ आणि मध्य प्रदेशातील या आधी निवडणूक स्थगित झालेल्या, 29-बैतुल या लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी मतदान होणार
12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 19 एप्रिल 2024
Posted On:
11 APR 2024 2:04PM by PIB Mumbai
लोकसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे. लोकसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 94 लोकसभा मतदारसंघांसाठी राजपत्रित अधिसूचना उद्या म्हणजेच 12.04.2024 रोजी जारी केली जाईल. मध्य प्रदेशातील, या आधी निवडणूक स्थगित झालेल्या, 29-बैतुल लोकसभा मतदारसंघा साठी स्वतंत्रपणे अधिसूचना देखील 12.04.2024 रोजी जारी केली जाईल.
मध्य प्रदेशातील, निवडणूक स्थगित झालेल्या 29-बैतुल (अनुसूचित जमातीसाठी राखीव) या लोकसभा मतदारसंघासह, 94 लोकसभा मतदारसंघांमध्ये 07.05.2024 रोजी मतदान होईल. मध्य प्रदेशातील 29-बैतुल या लोकसभा मतदारसंघासाठी, दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार होते. मात्र, बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराच्या मृत्यूमुळे मतदान पुढे ढकलण्यात आले होते.
आसाम, बिहार, छत्तीसगड, दादरा आणि नगर हवेली आणि दमण-दीव, गोवा, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही, लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात समाविष्ट असलेली राज्ये/केंद्रशासित प्रदेश आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

***
N.Chitale/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2017676)
Visitor Counter : 255
Read this release in:
Tamil
,
Telugu
,
Malayalam
,
Assamese
,
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Kannada