भारतीय निवडणूक आयोग
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये चुकीची माहिती खोडून काढण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने 'मिथक विरुद्ध तथ्ये रजिस्टर' केले सुरु
सहज सोप्या स्वरूपात निवडणुकीसंबंधी विश्वासार्ह आणि खरी माहिती आता एका बटणाच्या क्लिकवर
Posted On:
02 APR 2024 5:42PM by PIB Mumbai
चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेची सचोटी टिकवून ठेवण्यासाठी, केंद्रीय निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुका 2024 चा एक भाग म्हणून ''मिथक विरुद्ध तथ्ये रजिस्टर' सुरु केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांच्यासह नवी दिल्ली येथील निर्वाचन सदन येथे आज या उपक्रमाचा प्रारंभ केला. निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे (https://mythvsreality.eci.gov.in/ ) ''मिथक विरुद्ध तथ्ये रजिस्टर' जनतेसाठी उपलब्ध आहे. खोटी माहिती खोडून काढून खरी माहिती समोर आणण्यासाठी तसेच नवीन एफएक्यू (वारंवार विचारले जाणारे प्रश्न ) समाविष्ट करण्यासाठी रजिस्टरचे तथ्यात्मक मॅट्रिक्स नियमितपणे अपडेट केले जातील. निवडणूक प्रक्रियेचे चुकीच्या माहितीपासून रक्षण करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांमध्ये '''मिथक विरुद्ध तथ्ये रजिस्टर' हा एक मैलाचा दगड ठरेल.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सार्वत्रिक निवडणुका 2024 चे वेळापत्रक घोषित करताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते की संपूर्ण मतदान प्रक्रियेची पारदर्शकता आणि सचोटी सुनिश्चित करताना पैसा, ताकद आणि आदर्श आचारसंहिता उल्लंघन यासह चुकीची माहिती हे देखील एक प्रमुख आव्हान आहे. चुकीची माहिती आणि खोट्या गोष्टींचा प्रसार हा जागतिक स्तरावर अनेक लोकशाही देशांसाठी वाढता चिंतेचा विषय बनत असून केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा अभिनव आणि स्तुत्य उपक्रम मतदारांना संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान अचूक आणि सत्यापित माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.
''मिथक विरुद्ध तथ्ये रजिस्टर' ' हे निवडणुकीच्या काळात प्रसारित होणाऱ्या मिथक आणि खोट्या बातम्या खोडून काढण्यासाठी खऱ्या माहितीचे सर्वसमावेशक भांडार म्हणून काम करेल आणि मतदारांना योग्य निर्णय घेण्यास सक्षम बनवेल. ईव्हीएम /व्हीव्हीपीएटी संबंधी मिथक आणि चुकीची माहिती, मतदार यादी/मतदार सेवा, निवडणुकांचे आयोजन आणि इतर क्षेत्रांना व्यापकपणे समाविष्ट करून वापरकर्त्यासाठी अनुकूल स्वरूपात याची रचना केली आहे. हे रजिस्टर निवडणूक संबंधित खोटी माहिती खोडून काढून खरी माहिती, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरत असलेली संभाव्य मिथके , महत्त्वाच्या विषयांवरील एफएक्यू आणि सर्व संबंधितांसाठी विविध विभागांतर्गत संदर्भ साहित्य उपलब्ध करून देते. रजिस्टर नियमितपणे अपडेट केले जाईल.
सर्व संबंधितांना ''मिथक विरुद्ध तथ्ये रजिस्टर' मध्ये उपलब्ध माहितीबरोबर अन्य कोणत्याही मार्गाने प्राप्त संशयास्पद माहितीची पडताळणी आणि पुष्टी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर माहितीची पडताळणी करण्यासाठी, चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी, मिथके खोडून काढण्यासाठी आणि 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत सतर्क राहण्यासाठी केला जाऊ शकतो. वापरकर्ते रजिस्टरवरून विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती सामायिक करू शकतात.
***
S.Kakade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2016961)
Visitor Counter : 231
Read this release in:
Telugu
,
Malayalam
,
Bengali
,
Odia
,
English
,
Gujarati
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Tamil
,
Kannada