पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान -आवास योजना महिलांच्या  सक्षमीकरणाला चालना देण्यात एक प्रभावी माध्यम ठरली आहे: पंतप्रधान

Posted On: 08 MAR 2024 3:35PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रतिष्ठा आणि सशक्तीकरण सुनिश्चित करण्यात घराच्या मध्यवर्ती भूमिकेवर भर दिला.

आजच्या  महिला दिनानिमित्त ते म्हणाले की, पंतप्रधान -आवास योजना महिलांच्या  सक्षमीकरणाला चालना देण्यात एक प्रभावी माध्यम ठरली आहे

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

"घर हा प्रतिष्ठेचा पाया आहे. इथूनच सशक्तीकरणाला सुरुवात होते आणि स्वप्नांना पंख लाभतात.

महिलांच्या  सक्षमीकरणाला चालना देण्यात पंतप्रधान -आवास योजना महत्वपूर्ण ठरली आहे. "

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2012881) Visitor Counter : 71