पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष श्रीमत् स्वामी स्मरणानंद जी महाराज यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी पंतप्रधानांच्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 04 MAR 2024 8:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 मार्च 2024

 

रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष, श्रीमत् स्वामी स्मरणानंद जी महाराज यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी आणि उत्तम आरोग्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुभेच्छा व्यक्त केल्या.

एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“मी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष श्रीमत् स्वामी स्मरणानंदजी महाराज यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत आहे. त्यांची शिकवण आणि आध्यात्मिक मार्गदर्शन हे अनेकांसाठी प्रकाशाचे दीपस्तंभ आहेत आणि आपल्या समाजाच्या आध्यात्मिक वृद्धीसाठी आणि कल्याणासाठी त्यांनी दिलेले योगदान अतिशय उल्लेखनीय आहे.”

 

* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2011399) आगंतुक पटल : 129
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , English , Urdu , हिन्दी , Bengali-TR , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam