मंत्रिमंडळ
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्रिमंडळाने एकात्मिक रोग नियंत्रण आणि साथीच्या रोगाविरोधात सज्जतेसाठी राष्ट्रीय एक आरोग्य अभियानाचे नेतृत्व करण्यासाठी शास्त्रज्ञ 'एच' (वेतन स्तर-15) स्तरावर नागपूर येथील राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या संचालक पदाच्या निर्मितीला दिली मंजुरी

प्रविष्टि तिथि: 29 FEB 2024 6:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 29 फेब्रुवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील  केंद्रीय मंत्रिमंडळाने शास्त्रज्ञ एच स्तरावर (वेतन स्तर 15 मध्ये) नागपूर येथील राष्ट्रीय आरोग्य संस्थेचे संचालक म्हणून एका पदाच्या निर्मितीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मानव, प्राणी, वनस्पती आणि पर्यावरणीय क्षेत्रांना एकत्र आणून, एकात्मिक रोग नियंत्रण आणि साथीच्या तयारीसाठी बहु-मंत्रालयीन आणि बहु-क्षेत्रीय राष्ट्रीय एक आरोग्य अभियानाचे संचालक म्हणूनही ते काम करतील.

आर्थिक परिणाम:

शास्त्रज्ञ 'एच' स्तरावर वेतन स्तर 15 (रु. 1,82,000 - रु. 2,24,100) मध्ये राष्ट्रीय एक आरोग्य संस्थेसाठी संचालक पदाची निर्मिती केल्यास अंदाजे वार्षिक 35.59 लाख रुपये इतका खर्च येईल.

अंमलबजावणी धोरण आणि उद्दिष्टे:

नागपूर येथील राष्ट्रीय आरोग्य संस्थेचे संचालक मानव, प्राणी, वनस्पती आणि पर्यावरणीय क्षेत्रांना एकत्र आणून, एकात्मिक रोग नियंत्रण आणि साथीच्या तयारीसाठी बहु-मंत्रालयीन आणि बहु-क्षेत्रीय राष्ट्रीय एक आरोग्य अभियानाचे संचालक म्हणूनही  काम करतील. राष्ट्रीय एक आरोग्य अभियानासाठी एकात्मिक रोग केंद्र आणि साथीच्या तयारीसाठी संशोधन आणि विकास अधिक मजबूत  करण्यासाठी एक कार्यक्रम  01.01.2024 रोजी मंजूर करण्यात आला आहे.

रोजगार निर्मितीसह इतर मोठे परिणाम :

राष्ट्रीय एक आरोग्य अभियान भारताला एक आरोग्य दृष्टीकोन प्रदान करून एकात्मिक रोग नियंत्रण आणि साथीच्या रोगविरोधात तयारी करण्यास मदत करेल. याशिवाय मानव, प्राणी, वनस्पती आणि पर्यावरणाच्या आरोग्यासाठी सर्वांगीण आणि शाश्वत पद्धतीने कार्य करण्यासाठी सहयोग वाढवून विविध मंत्रालये/विभागांच्या चालू/नियोजित कार्यक्रमांचा लाभ देखील मिळू शकेल.

S.Kane/B.Sontakke/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2010267) आगंतुक पटल : 179
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Tamil , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Telugu , Kannada , Malayalam