पंतप्रधान कार्यालय

सम्मक्का-सरक्का मेदारम जथारा या सर्वात मोठ्या आदिवासी सणाच्या प्रारंभाच्या पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

Posted On: 21 FEB 2024 10:30AM by PIB Mumbai

आदिवासींच्या सर्वात मोठ्या सणांपैकी एक असलेल्या सम्मक्का-सरक्का मेदारम जथारा या सणाच्या प्रारंभाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  शुभेच्छा दिल्या आहेत.मोदी यांनी  सम्माक्का-सरक्का यांना वंदन करत  मूर्तिमंत  उदाहरण  असलेल्या त्यांच्या ऐक्याचे आणि शौर्याचे स्मरण केले आहे .

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;

सर्वात मोठ्या आदिवासी सणांपैकी एक असलेल्या
आणि आपल्या सांस्कृतिक वारशाच्या चिरस्थायी भावनेचा सचेत आविष्कार असलेल्या समक्का-सरक्का मेदारम जथारा या सणाला प्रारंभ झाल्याबद्दल शुभेच्छा.  हा जथारा म्हणजे भक्ती, परंपरा आणि सामुदायिक भावनेचा उत्तम संगम आहे.  आपण सम्माक्का-सरक्का यांना वंदन करूया आणि मूर्तिमंत  उदाहरण  असलेल्या त्यांच्या ऐक्याचे आणि शौर्याचे स्मरण  करूया.”

***

JPS/SBC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2007601) Visitor Counter : 63