पंतप्रधान कार्यालय

जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली


कर्पूरी ठाकूर यांच्या समाज आणि राजकारणावरील अतुलनीय प्रभावाबद्दलचे विचार पंतप्रधानांनी केले सामायिक

Posted On: 24 JAN 2024 9:22AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जननायक कर्पूरी ठाकूर यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. या विशेष प्रसंगी कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न प्रदान करण्याचा सन्मान आमच्या सरकारला मिळाला आहे असे पंतप्रधान म्हणाले.

तसेच कर्पूरी ठाकूर यांच्या समाज आणि राजकारणावरील अतुलनीय प्रभावाबद्दलचे विचार पंतप्रधानांनी सामायिक केले.

पंतप्रधानांनी संदेशात म्हटले आहे;

"जननायक कर्पूरी ठाकूर जी यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मी आदरपूर्वक आदरांजली अर्पण करतो. या विशेष प्रसंगी, त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याचे भाग्य आमच्या सरकारला लाभले आहे. भारतीय समाज आणि राजकारणावर त्यांनी अमिट ठसा उमटला होता. त्याबद्दल भावना आणि विचार मी शब्दबद्ध केले आहेत.”

"माझ्या संपूर्ण देशबांधवांच्या वतीने, जननायक कर्पूरी ठाकूर जी यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मी आदरपूर्वक आदरांजली अर्पण करतो. या विशेष प्रसंगी, त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याचे भाग्य आमच्या सरकारला लाभले आहे. भारतीय समाज आणि राजकारणावर त्यांचा अमिट ठसा उमटला होता. त्याबद्दलच्या माझ्या भावना आणि विचार मी तुमच्यासोबत सामायिक करतो आहे. https://nm-4.com/vLEoBk

***

SonalT/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1999053) Visitor Counter : 82