पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले
Posted On:
23 JAN 2024 9:22AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. बाळासाहेब ठाकरे हे एक असे उत्तुंग व्यक्तिमत्व होते, ज्यांचा महाराष्ट्रातील राजकीय आणि सांस्कृतिक पटलावरील प्रभाव कायमच अतुलनीय राहील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
"बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी त्यांचे स्मरण. बाळासाहेब ठाकरे हे एक असे उत्तुंग व्यक्तिमत्व होते, ज्यांचा महाराष्ट्रातील राजकीय आणि सांस्कृतिक पटलावरील प्रभाव कायमच अतुलनीय राहील. त्यांचे नेतृत्वगुण, आपल्या मूल्यांप्रती असलेली दृढ निष्ठा आणि गरीब आणि वंचितांच्या हक्कासाठी आवाज उठवण्याबद्दलची त्यांची वचनबद्धता यामुळे ते कायमच अगणित लोकांच्या हृदयात स्थान करून आहेत."
असे पंतप्रधानांनी एक्स वर म्हटले आहे.
***
SonalT/BhaktiS/DY
(Release ID: 1998763)
अभ्यागत कक्ष : 197
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam