पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताची पहिली सौर वेधशाळा आदित्य-L1 आपल्या गंतव्यस्थानी पोहोचल्याबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त

प्रविष्टि तिथि: 06 JAN 2024 5:10PM by PIB Mumbai

 

भारताची पहिली सौर वेधशाळा आदित्य-L1 आपल्या गंतव्यस्थानी पोहोचल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला.

ही कामगिरी आपल्या शास्त्रज्ञांच्या मेहनतीचा  दाखला असल्याचे सांगून ते म्हणाले की, मानवतेच्या हितासाठी  आपण विज्ञानाच्या नव-नव्या सीमा पार करत राहू.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

"भारताने आणखी एक महत्त्वाची कामगिरी  केली आहे. भारताची पहिली सौर वेधशाळा आदित्य-L1 आपल्या निश्चित केलेल्या गंतव्यस्थानावर पोहोचली आहे. सर्वात जटिल आणि गुंतागुंतीच्या अंतराळ मोहिमांपैकी एक साकार करणे हा आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक मेहनतीचा  दाखला आहे. या अलौकिक कामगिरीचे कौतुक करण्यासाठी मी देशासमवेत उभा आहे. मानवतेच्या फायद्यासाठी आपण विज्ञानाच्या नव-नव्या सीमा पार करत राहू.’’

***

N.Chitale/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1993838) आगंतुक पटल : 241
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam