पंतप्रधान कार्यालय
डीएमडीकेचे संस्थापक विजयकांत यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
28 DEC 2023 11:06AM by PIB Mumbai
डीएमडीकेचे संस्थापक आणि ज्येष्ठ अभिनेते विजयकांत यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शोक व्यक्त केला आहे. तामिळनाडूच्या राजकीय पटलावर अमिट छाप उमटवणाऱ्या विजयकांत यांच्या सार्वजनिक सेवेचे त्यांनी स्मरण केले.
पंतप्रधानांनी आपल्या एक्स वर पोस्ट म्हटले आहे:
"थिरू विजयकांत जी यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाले आहे. तामिळ चित्रपट जगतातील एक दिग्गज कलावंत असलेल्या त्यांच्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांचे मनं जिंकले होते.
सार्वजनिक सेवा करण्याच्या दृष्टीने एक राजकीय नेते म्हणून, ते अत्यंत निष्ठावंत होते, ज्यामुळे तामिळनाडूच्या राजकीय पटलावर त्यांचा कायमस्वरूपी प्रभाव होता. त्याच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे जी भरून काढणे कठीण आहे. ते माझे जवळचे सुह्रुद होते आणि इतक्या वर्षांत माझे त्यांच्याशी झालेले संभाषण मला मनापासून आठवते. या दुःखाच्या क्षणी, माझ्या संवेदना त्यांचे कुटुंब, चाहते आणि असंख्य अनुयायांसोबत आहेत. ओम शांती ".
***
NM/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1991184)
Visitor Counter : 130
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam