पंतप्रधान कार्यालय
भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या भविष्याबाबत पंतप्रधानांनी युवराज मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल लजीझ अल सौद यांच्याशी साधला संवाद
दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीबाबत आपले विचार मांडले तसेच दहशतवाद, हिंसाचार आणि नागरिकांच्या जीवितहानीबद्दल व्यक्त केली चिंता
Posted On:
26 DEC 2023 7:48PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवराज मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल लजीझ अल सौद यांच्याशी भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या भविष्याबाबत चर्चा केली .
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“माझे मित्र युवराज प्रिन्स मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अजीझ अल सौद यांच्याशी भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या भविष्याबाबत उपयुक्त चर्चा झाली. आम्ही पश्चिम आशियातील परिस्थितीबाबत विचारांची देवाणघेवाण केली तसेच दहशतवाद, हिंसाचार आणि नागरिकांच्या जीवितहानीबद्दल चिंता व्यक्त केली. प्रदेशातील शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्यासाठी एकत्र काम करण्याबाबत सहमती दर्शवली."
***
S.Bedekar/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1990593)
अभ्यागत कक्ष : 145
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam