पंतप्रधान कार्यालय
कुवेतच्या नवीन अमीरांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
20 DEC 2023 10:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 डिसेंबर 2023
कुवेतचे नवे अमीर म्हणून आज पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महामहिम शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांचे अभिनंदन केले. भविष्यात भारत-कुवेत संबंध अधिक दृढ होतील, ज्यामुळे मध्यपूर्वेतील भारतीय समुदायाची भरभराट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
एक्स वरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले:
"कुवेत साम्राज्याचे अमीर म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल महामहिम शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांना शुभेच्छा आणि अभिनंदन. येत्या काही वर्षांत आमचे संबंध आणखी दृढ होतील आणि कुवेतमधील भारतीय समुदायाची भरभराट होत राहील, असा विश्वास आहे".
* * *
S.Tupe/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1989084)
Visitor Counter : 83
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam