माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रधानमंत्री उज्वला योजना: धूरमुक्त स्वयंपाकगृहाची स्वप्नपूर्ती


विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान अनेक जणांनी या योजनेच्या सकारात्मक परिणामांविषयी सांगितले

Posted On: 19 DEC 2023 2:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 डिसेंबर 2023

 

सध्या सुरु असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान अनेक महिलांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळालेल्या एल पी जी अर्थात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर मुळे त्यांच्या जीवनात आलेल्या परिवर्तनाबद्दल माहिती दिली. एल पी जी गॅस सिलेंडर सारख्या एका छोट्याशा गोष्टीमुळे देशभरातील महिलांना अनेकविध लाभ झाले आहेत. काहींना पारंपरिक चुलीवर स्वयंपाक केल्यामुळे निर्माण होत असलेल्या  शरीराला हानिकारक अशा धुरापासून मुक्ती मिळाल्याचा आनंद आहे तर काहींना सरपण गोळा करण्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनत यांची बचत झाल्याने समाधान वाटत आहे.

या यात्रेच्या एक महिन्याच्या कालावधीत सुमारे 3.77 लाख महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केल्याने वर्ष 2016 मध्ये या योजनेच्या आरंभानंतर आतापर्यंत लाभ मिळालेल्या कोट्यवधी महिलांमध्ये त्यांची भर पडली  आहे. जर कोणी या यात्रेदरम्यान महिलांनी व्यक्त केलेल्या अनुभवांचा विचार केला तर  प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही कोट्यवधी महिलांच्या साठी एका उत्तम गुणवत्तापूर्ण आयुष्याच्या दिशेने जीवनमान उंचावण्यासाठीचा एक उल्लेखनीय असा निर्णय ठरल्याचे तात्पर्य नक्कीच काढता येईल. सीमा कुमारी आणि बच्चन देवी यांना काय अनुभव आले ते पाहूया.

उत्तर प्रदेशातील चांदौली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सीमा कुमारी यांना त्यांच्या स्वयंपाकघरात रोज अडचणींचा सामना करावा लागत असे. इतर अनेक भारतीय घरांमप्रमाणे सीमा कुमारी यांना देखील पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक करावा लागत असे, ज्यासाठी त्यांना रोजच्यारोज सरपण गोळा करावे लागत असे. चुलीतून येणाऱ्या धुरामुळे त्यांना डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागत असे आणि पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असे. शिवाय सरपण वापरून स्वयंपाक करताना वेळ देखील भरपूर लागत असे.  ही अथक दिनचर्या इतकी कठीण होती की  धूरमुक्त स्वयंपाकघराची कल्पना त्यांच्यासाठी स्वप्नवत होती.  

मात्र प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने यामध्ये वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे त्यांचे जीवनच बदलून गेले. एलपीजी सिलिंडर मिळाल्यानंतर, त्यांच्या  स्वयंपाकघराचा जणू कायापालट झाला, ते धूरमुक्त तर झालेच शिवाय त्यांना त्यांच्या कुटुंबियांसाठी पूर्वीच्या तुलनेत कमी कष्टात स्वयंपाक बनवणे शक्य झाले. एलपीजी सिलिंडरमुळे, त्या आता पटकन जेवण बनवू शकतात तसेच  वेळेवर आणि त्रासमुक्त स्वयंपाक करू शकतात. या सोयीमुळेच त्या आपल्या मुलांसाठी सहज जेवण बनवू शकतात. या अनमोल उपकाराबद्दल सीमा,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपार कृतज्ञता व्यक्त करत आहेत कारण यामुळे त्यांचे  जीवन लक्षणीयरीत्या सुधारले आहे.

त्याचप्रमाणे, जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील बचन देवी यांनी अशाच प्रकारचे संघर्ष सहन केले.  सरपण गोळा करून आणि घाईघाईने जेवण तयार करण्यातच त्यांचा दिवस सरत होता. ही एक आव्हानात्मक दिनचर्या होती. त्यांना ती अंतहीन वाटत होती. या अडचणींमधून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही असे बचन देवी यांना वाटले, तेव्हा पंतप्रधान उज्ज्वला योजनेने त्यांच्या जीवनात एक अनपेक्षित सकारात्मक बदल घडवून आणला. या योजनेअंतर्गत गॅस सिलिंडर मिळाल्याने त्यांचे आयुष्य चांगलेच बदलले. सरपण गोळा करण्याच्या त्रासातून मुक्तता देणाऱ्या सिलिंडर बद्दल बचन देवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानले आहेत.

या नवीन सोयीमुळे त्यांना मुलांसाठी वेळेवर जेवण शिजवता येते परिणामी त्यांच्या खांद्यांवरील भार कमी झाला आहे.

 

पंतप्रधान उज्ज्वला योजनेपूर्वीचे जीवन 

पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या क्रांतीपूर्वी कोट्यवधी कुटुंबांना स्वयंपाकासाठी, लाकूड, कोळसा आणि शेणासारख्या पारंपरिक इंधनाचा वापर करणे भाग होते. भारतीय महिलांनी धुराने भरलेल्या स्वयंपाकघरात जेवण शिजवणे, त्यांना खोकला येणे आणि दिवसभर श्वास घेण्यास त्रास होणे हे सामान्य होते. यामुळे केवळ त्यांच्या आरोग्यावरच परिणाम झाला नाही तर पर्यावरणाच्या समस्याही वाढल्या. अनेक महिलांनी, धूर आणि हानिकारक कण याबाबत पर्याय शोधण्याची आशाच सोडली होती.

तथापि, ग्रामीण आणि वंचित कुटुंबांना एलपीजीसारखे स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने मे 2016 मध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजना (पीएमयूवाय) सुरू केली. हा उपक्रम भारतीय महिलांसाठी एक आनंद देणारा अनुभव ठरला, ज्यांनी अनेक पिढ्यांचे कष्ट सहन केले आणि शेवटी धुरमुक्त स्वयंपाकघराचे स्वप्न साकार केले. सीमा कुमारी आणि बचन देवी यांच्या कथा भारतभरातील असंख्य महिलांचे प्रतिनिधीत्व करतात. जरी त्यांची नावे, संस्कृती आणि पार्श्वभूमी वेगळी असली तरी त्यांच्यात एक समान भावना आहे-अनेक वर्षांच्या संघर्षातून दिलासा आणि त्यांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलाबद्दल कृतज्ञतेची भावना!

संदर्भ:

 

* * *

S.Tupe/Bhakti/Vinayak/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1988120) Visitor Counter : 160