पंतप्रधान कार्यालय
परीक्षेच्या ताणाला यशात रुपांतरीत करून परीक्षा योद्ध्यांना हसत हसत परीक्षा देणे शक्य करणे हा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा उद्देश आहे : पंतप्रधान
Posted On:
14 DEC 2023 10:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 डिसेंबर 2023
परीक्षेच्या ताणाला यशात रुपांतरीत करून परीक्षा योद्ध्यांना हसत हसत परीक्षा देणे शक्य करणे हा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने एक्स मंचावरील संदेशाद्वारे, विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना परीक्षा पे चर्चा 2024 उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
खाली दिलेल्या संकेतस्थळाला भेट देऊन कोणतीही व्यक्ती या उपक्रमात सहभागी होऊ शकते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळवू शकते, असे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या संदेशात म्हटले आहे. संकेतस्थळाची लिंक खाली दिली आहे.
https://innovateindia.mygov.in/ppc-2024/
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने एक्स मंचावर पाठवलेल्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान एक्स मंचावरील संदेशात लिहितात;
“ताणतणावाला यशात रुपांतरीत करून #ExamWarriors ना हसत हसत परीक्षा देणे शक्य करणे हा #ParikshaPeCharcha या कार्यक्रमाचा उद्देश आहे. कोणास ठाऊक, यापुढील आपल्या संवादात्मक सत्रादरम्यान आपल्याला अभ्यासाविषयी एखादी फार उत्तम सूचना अचानक मिळून जाईल!”
* * *
S.Kakade/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1986488)
Visitor Counter : 185
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam