माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विकसित भारत संकल्प यात्रा : आरोग्य आणि निरामयतेला देत आहे चालना


26,000 हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये आयुष्मान कार्डचे 100% वितरण

प्रविष्टि तिथि: 13 DEC 2023 5:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 डिसेंबर 2023

 

“ज्यादिवशी प्रत्येक गरिबाला मोफत अन्नधान्यासाठी शिधापत्रिका, उज्ज्वला योजनेतून गॅस जोडणी, घरांना वीजपुरवठा, नळपाणी जोडणी, आयुष्मान कार्ड आणि पक्के घर मिळेल  त्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत आहे" - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2023 रोजी  सुरू केलेली विकसित भारत संकल्प यात्रा, तळागाळातील लोकांना योजनांचे पुरेपूर लाभ देण्यासाठी आरोग्य उपक्रमांना चालना देणारा  एक भक्कम  मंच  बनला आहे.आयईसी वाहने  त्यांच्यासोबत विकासाचा संदेश घेऊन जातात, तसेच त्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजनही करण्यात येते. क्षयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादीसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि चाचण्या  या  शिबिरांमध्ये केल्या जातात.  

आजपर्यंत 63 लाखांहून अधिक लोकांनी आरोग्य शिबिरांचा लाभ घेतला आहे. यात्रेदरम्यान, 26,752 हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये 100%  आयुष्मान कार्ड वितरीत (12 डिसेंबर 2023 पर्यंत) केली आहेत.

विकसित भारत संकल्प यात्रा  निरोगी भारत या  उपक्रमाचा एक भाग म्हणून खालील उपक्रम राबवले जात आहेत:

आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (एबी- पीएमजेएवाय) कार्डांसाठी नोंदणी: सरकारच्या प्रमुख आरोग्य सेवा योजनेंतर्गत आयुष्मान अॅप वापरून आयुष्मान कार्ड तयार केले जात आहेत आणि लाभार्थ्यांना प्रत्यक्षरित्या  कार्ड वितरित केले जात आहेत. 12 डिसेंबर 2023 पर्यंत व्हीबीएसवाय  शिबिरांमध्ये 9.69 लाखांहून अधिक आयुष्मान कार्ड जारी करण्यात आले आहेत. आयुष्मान कार्ड शिबिरांमध्ये 1.53  लाखांहून अधिक लोकांनी सेवांचा लाभ घेतला आहे.

क्षयरोग तपासणी : विकसित भारत संकल्प यात्रेच्या  थांबे असलेल्या ठिकाणी  क्षयरोगाची तपासणी देखील केली जात आहे. क्षयरोगाच्या संशयित रुग्णांना उपचार घेण्यासाठी उच्च वैद्यकीय सुविधांसाठी  पाठवले जाते. आजपर्यंत 26.41लाख लोकांची क्षयरोग तपासणी करण्यात आली आहे

प्रधानमंत्री क्षयरोग  मुक्त भारत अभियान (पीएमटीबीएमए) अंतर्गत क्षयरुग्णांना इतर मदत देखील दिली जात आहे आणि  निक्षय मित्रांकडून मदत मिळण्यासाठी क्षयरोग रूग्णांची  संमती घेतली जात आहे. क्षयरुग्णांच्या मदतीसाठी निक्षय मित्र म्हणून स्वयंसेवा करण्यास इच्छुक असलेल्या उपस्थितांची तत्परता  रुग्णांप्रती बांधिलकीची अनुभूती देते. त्यांची तिथल्या तिथे नोंदणी करून  त्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

क्षय रुग्णांना मदत करणारा आणखी एक सरकारी उपक्रम म्हणजे निक्षय पोषण योजना (एनपीवाय ) याचाही लाभ दिला जात आहे, ज्या अंतर्गत थेट लाभ हस्तांतरणाद्वारे लोकांना आर्थिक मदत दिली जाते.

सिकलसेल आजार  (एससीडी ) तपासणी : व्हीबीएसवाय  आरोग्य शिबिरांमध्ये उपस्थितांना सिकलसेल रोगाची तपासणी देखील करता येते. हा रोग प्रामुख्याने आदिवासी लोकसंख्येवर परिणाम करत असल्याने, लक्षणीय आदिवासी लोकसंख्या असलेल्या भागात तपासणी केली जात आहे.एससीडीसाठी पॉइंट ऑफ केअर (PoC) चाचण्यांद्वारे किंवा विद्राव्यता चाचणीद्वारे  पात्र लोकांची (म्हणजे 40 वर्षांपर्यंतचे लोक) चाचणी केली  जात आहे. आजपर्यंत, व्हीबीएसवाय थांबलेल्या ठिकाणांवरील 6.12 लाख उपस्थितांची सिकलसेल आजार तपासणी करण्यात आली आहे.

असंसर्गजन्य रोगांची तपासणी : 30 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील लोक उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची तपासणी देखील करू  शकतात. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांना उच्च वैद्यकीय केंद्रात चांगल्या उपचारासाठी पाठवले जाते.

संदर्भ:

· https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=1977062

· https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=1980126

· https://twitter.com/HSVB2047/status/1732081624580489547?t=iSg-qdR2fRQBgN1n4jn98g&s=08

· https://viksitbharatsankalp.gov.in/dashboards/dashboard1

· https://twitter.com/mohfw_india/status/1734470978129043536?s=46

 

* * *

N.Chitale/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1985912) आगंतुक पटल : 146
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Kannada , Bengali , Urdu , हिन्दी , Punjabi , Gujarati , Odia , Tamil