पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

महिला ही एकच जात संख्येने एवढी मोठी की त्या एकत्रित कुठल्याही आव्हानाचा सामना करू शकतील'


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दरभंगा, बिहार इथल्या विकसित भारताच्या लाभार्थी गृहिणी, प्रियंका देवी यांच्याशी संवाद

कोणतीही योजना यशस्वी व्हायची असेल, तर त्यासाठी ती प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचणे आवश्यक – पंतप्रधान

Posted On: 09 DEC 2023 2:55PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थींशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. सध्या देशभरात, केंद्र सरकारच्या योजना सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि योग्य वेळेत त्यांची संपूर्ण अंमलबजवणी सुनिश्चित करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा राबवली जात आहे.

बिहारमध्ये दरभंगा येथील गृहिणी आणि विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थी प्रियंका देवी यांनी पंतप्रधानांना सांगितले की त्यांचे पती मुंबईत रोजंदारीवर काम करणारे श्रमिक आहेत आणि त्यांना एक देश एक शिधापत्रिकायोजनेचा लाभ मिळतो आहे. तसेच पीएम जी के ए वाय आणि जन धन योजना अशा योजनांचाही लाभ घेत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषत: कोविडच्या काळात किंवा इतर संकट काळात आर्थिक चणचण असताना या योजनांमुळे मोठी मदत झाली असे त्यांनी सांगितले.

मोदी की गारंटी या वाहनाबद्दल लोकांमधे अत्यंत उत्साह आहे, असे त्यांनी सांगितले. मिथिला भागात पारंपरिक पद्धतीने या वाहनाचे स्वागत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सरकारच्या योजनांमुळे त्यांना त्यांच्या मुलांचे शिक्षण आणि संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेता येते आहे, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी प्रियंका यांना त्यांच्या गावात सरकारी योजनांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले आणि मोदी की गारंटीवाहन देशातील प्रत्येक गावात पोहोचल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कोणतीही योजना यशस्वी होण्यासाठी प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला.  मोदी की गारंटीवाहनाच्या माध्यमातून, सरकार स्वत: पोहोचू न शकलेल्या लाभार्थींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचण्यास सरकार कटिबद्ध आहे, असे सांगत, महिलांच्या मनात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने फुटीरतावादी राजकारण करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा पंतप्रधानांनी दिला.  महिलांना अखंड पाठिंबा देण्याची ग्वाही देतानाच, “आमच्यासाठी महिला ही एकच जात आहे, त्यात कोणतीही विभागणी नाही, भेदभाव नाही. ही जात इतकी मोठी आहे की त्या एकत्र कोणत्याही आव्हानाला सामोरे जाऊ शकतात”,  असे पंतप्रधान म्हणाले.

***

M.Pange/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1984510) Visitor Counter : 83