गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, "सायबर सुरक्षित भारत" ची निर्मिती करणे हे गृह मंत्रालयाच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे.


I4सी , राष्ट्रीय सायबर गुन्हे धोके विश्लेषण युनिटच्या (एनसीटीएयु ) माध्यमातून गेल्या आठवड्यात संघटित गुंतवणूक/कार्य आधारित - अर्धवेळ नोकरीचे आश्वासन देणाऱ्या फसवणुकीशी संबंधित 100 हून अधिक संकेतस्थळे ओळखण्यात आली असून ती ब्लॉक करण्याची शिफारस

Posted On: 06 DEC 2023 10:12AM by PIB Mumbai

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री  अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, "सायबर सुरक्षित भारत" ची निर्मिती करणे  हे गृह मंत्रालयाच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे.
केंद्रीय गृहमंत्री   अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, गृह मंत्रालय सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि लोकांना सायबर धोक्यांपासून संरक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहे. नागरिकांनी अशा फसवणूक करणाऱ्यांनी वापरलेले दूरध्वनी क्रमांक  आणि समाजमाध्यम  हँडल यांची माहिती  एनसीआरपी www.cybercrime.gov.in कडे त्वरित कळवावी.
देशातील सायबर गुन्ह्यांना   समन्वित आणि सर्वसमावेशक पद्धतीने चाप लावण्यासाठी   भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र  (I4सी ) हा केंद्रीय गृहमंत्रालयाचा    एक उपक्रम आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या  I4 सी सह  राष्ट्रीय  सायबर गुन्हे  धोके विश्लेषण युनिटने  (एनसीटीएयु )   गेल्या आठवड्यात संघटित गुंतवणूक/कार्य  आधारित - अर्धवेळ नोकरी देण्याचे  आश्वासन देत   फसवणूक करणारी   100 हून अधिक संकेतस्थळे  ओळखली असून त्यांना ब्लॉक करण्याची  शिफारस केली आहे  इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान  मंत्रालयाने   माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 अंतर्गत आपल्या अधिकाराचा वापर करून, ही संकेतस्थळे  ब्लॉक केली आहेत. बेकायदेशीर गुंतवणुकीशी संबंधित आर्थिक गुन्ह्यांवर आधारित/संघटित कृती   करणारी ही संकेतस्थळे परदेशातून चालवली जातात आणि हे करण्यासाठी   डिजिटल जाहिराती, चॅट मेसेंजर आणि बनावट /दुसरी  खाती वापरत असल्याचे समजले. कार्ड नेटवर्क, क्रिप्टो चलन , परदेशी  एटीएममधून  पैसे काढणे आणि आंतरराष्ट्रीय फिनटेक कंपन्यांचा वापर करून, मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणुकीतून मिळालेली रक्कम अनधिकृतपणे  भारताबाहेर पाठवली जात असल्याचेही दिसून आले आहे.

 

या संदर्भात 1930 हा हेल्पलाईन क्रमांक आणि एनसीआरपी यांच्या माध्यमातून अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत आणि असे गुन्हे नागरिकांसाठी मोठा धोका निर्माण करत आहेत आणि त्याचबरोबर यामुळे माहितीच्या सुरक्षिततेविषयी चिंताजनक स्थिती निर्माण होत आहे. या फसवणुकीच्या घटनांमध्ये सामान्यतः खालील प्रकारे पावले उचलली जातात:-
1. गुगल आणि मेटा यांसारख्या मंचांवर लक्ष्यित डिजिटल जाहिराती प्रसारित करण्यात येतात आणि त्यामध्ये परदेशी जाहिरातदारांकडून विविध भाषांमध्ये “घरच्या घरी बसून नोकरी”, “घरात राहून उत्पन्न कसे मिळवाल” असे लक्ष वेधून घेणारे शब्दप्रयोग केले जातात. बहुतेकदा अर्धवेळ नोकरी शोधणाऱ्या निवृत्त व्यक्ती, महिला आणि बेरोजगार तरुण हे अशा प्रकारच्या जाहिरातींचे लक्ष्य असतात.
2. जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर, एखादा एजंट संभाव्य पिडीत व्यक्तीसोबत व्हॉट्सअप किंवा टेलीग्राम यांच्या माध्यमातून संवाद सुरु करतो आणि त्या व्यक्तीला एखादा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करणे, मॅप्स रेटिंग करणे यांसारखी कृती करायला भाग पडतो.
3. दिलेले कार्य पूर्ण केल्यानंतर, सुरुवातीला त्या व्यक्तीला कमिशन म्हणून काही रक्कम देण्यात येते आणि त्यानंतर, दिलेले कार्य पूर्ण करण्याचा अधिक मोबदला मिळवण्यासाठी म्हणून अधिक गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले जाते.
4. अशा पद्धतीने त्या व्यक्तीचा विश्वास जिंकल्यानंतर ती व्यक्ती अधिक रकमेची गुंतवणूक करते आणि या वेळी ही रक्कम गोठवण्यात येते आणि त्या व्यक्तीची फसवणूक होते.
 
सावधगिरीच्या उपाययोजना म्हणून खालील मार्गांचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात येतो:-
1. इंटरनेटवर प्रायोजित करण्यात येणाऱ्या आणि फार मोठ्या प्रमाणात कमिशन देणाऱ्या अशा कोणत्याही ऑनलाईन योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबद्दल सखोल माहिती गोळा करा.
2.. एखाद्या अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सअप किंवा टेलीग्राम यांच्या माध्यमातून तुमच्याशी संपर्क साधला तर व्यवस्थित पडताळणी करून घेतल्याशिवाय कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका.
3. युपीआय अॅप मध्ये रक्कम स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे जे नाव दिसते आहे त्याची पडताळणी करा. जर अशी व्यक्ती संशयास्पदरित्या यादृच्छिक वाटत असेल तर ते खाते घोटाळेबाज असू शकते आणि ती योजना फसवी असू शकेल. तसेच सुरुवातीला ज्या स्त्रोताकडून कमिशनची रक्कम अदा केली आहे त्या स्त्रोताची देखील तपासणी करा.
4. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी खात्यांशी आर्थिक व्यवहार करणे टाळावे. कारण अशी खाती खंडणीसारख्या व्यवहारांमध्ये आणि अगदी दहशतवादाला वित्तपुरवठा करण्यामध्ये देखील सहभागी असू शकतात. तसेच अशी खाती पोलिसांतर्फे गोठवली जाण्याची तसेच या खात्यांवर इतर कायदेशीर कारवाई होण्याची दाट शक्यता असते.

***

JPS/SonalT/SonalC/SanjanaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1983015) Visitor Counter : 147