पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी घेतली स्वीडनच्या पंतप्रधानांची भेट
प्रविष्टि तिथि:
01 DEC 2023 8:32PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीडनचे पंतप्रधान महामहीम
उल्फ क्रिस्टरसन यांच्या सोबत 1 डिसेंबर 2023 रोजी दुबई येथील कॉप-28 येथे द्विपक्षीय बैठक घेतली.
दोन्ही नेत्यांनी त्यांच्या द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर फलदायी चर्चा केली, ज्यात संरक्षण, संशोधन आणि विकास, व्यापार आणि गुंतवणूक आणि हवामानबाबत सहकार्य यांचा समावेश आहे. त्यांनी युरोपीय महासंघ, नॉर्डिक परिषद आणि नॉर्डिक बाल्टिक 8 गटासह प्रादेशिक आणि बहुपक्षीय मुद्द्यांवरही चर्चा केली.
स्वीडनच्या युरोपीय महासंघ परिषदेच्या अध्यक्षपदासाठी मिळालेल्या यशाबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांचे अभिनंदन केले.
***
S.Patil/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1981781)
आगंतुक पटल : 122
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam