पंतप्रधान कार्यालय
कॉप-28 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट
Posted On:
01 DEC 2023 7:55PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 डिसेंबर 2023 रोजी यूएई मध्ये कॉप-28 परिषदेच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली.
कॉप-28 परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल पंतप्रधानांनी शेख मोहम्मद बिन झायेद यांचे अभिनंदन केले. त्यांनी कॉप-28 मध्ये ग्रीन क्लायमेट प्रोग्राम (GCP), अर्थात हरित हवामान कार्यक्रमावरील उच्च-स्तरीय कार्यक्रमाचे सह-आयोजन केल्याबद्दल अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे आभार मानले.
दोन्ही नेत्यांनी परस्पर देशांच्या व्यापक आणि गतिमान द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. त्यांनी इस्रायल-हमास संघर्षावरही विचार विनिमय केला.
पंतप्रधानांनी पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या व्हायब्रंट गुजरात परिषदेसाठी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांना आमंत्रित केले.
***
S.Patil/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1981761)
Visitor Counter : 92
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam