आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या प्रस्तावित नॅशनल फार्मसी कमिशन विधेयक -2023 यावर सामान्य जनतेकडून सूचना मागवल्या आहेत

Posted On: 20 NOV 2023 4:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2023

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय औषध निर्माण आयोगाची स्थापना करण्यासाठी आणि औषध निर्माण कायदा- 1948 रद्द करून; राष्ट्रीय औषध निर्माण आयोग विधेयक-2023 याला अंतिम स्वरूप देण्याचे ठरविले आहे.

त्यानुसार, राष्ट्रीय औषध निर्माण आयोगाच्या विधेयकाचा मसुदा तयार करण्यात आला असून तो 14-11-2023 रोजी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (बातम्या आणि विशेष विभागात) 10-11-2023 रोजी सर्वांसाठी अपलोड केला आहे.

या प्रस्तावित कायद्याला अधिक समृद्ध करण्यासाठी सामान्य लोक/भागधारकांच्याही सूचना/टिप्पण्या मागवलेल्या आहेत.  या सूचना 14-12-2023 पर्यंत hrhcell-mohfw[at]nic[dot]in वर किंवा publiccommentsahs[at]gmail[dot]com वर ई-मेलद्वारे पाठवल्या जाऊ शकतात.

 

NPC बिल/20 नोव्हेंबर 2023/1 वर HFW/सार्वजनिक सूचना

 

 

Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1978204) Visitor Counter : 66