पंतप्रधान कार्यालय
मेरी माटी मेरा देश उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी सहभागी झालेल्या सर्वांच्या कार्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रशंसा
मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने सेल्फी विथ मेरी माटी मोहिमेचे आयोजन
Posted On:
10 NOV 2023 8:10PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरी माटी मेरा देश उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी सहभागी झालेल्या सर्वांच्या कार्याची प्रशंसा केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत सेल्फी विथ मेरी माटी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
या मोहिमेत 40 विद्यापीठांच्या 7000 महाविद्यालयातील 25 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि या प्रचंड सहभागामुळे या मोहिमेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.
या मोहिमे संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या X वरील मनोगतावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी X वर मत व्यक्त केले;
या प्रयत्नामध्ये सहभागी असलेल्या सर्वांची मी प्रशंसा करतो, ज्यांनी #MeriMaatiMeraDesh चळवळीला मोठ्या प्रमाणावर चालना दिली आहे आणि एका प्रकारे राष्ट्रीय अभिमान आणि एकात्मतेच्या भावनेला प्रोत्साहित केले आहे.”
***
Jaydevi PS/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1976363)
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada