पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांशी साधला संवाद
दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील परिस्थिती आणि त्याचे व्यापक परिणाम यावर केली चर्चा
दोन्ही नेत्यांनी दहशतवाद, हिंसाचार आणि नागरिकांच्या जीवितहानीबद्दल चिंता केली व्यक्त
इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्द्यावर भारताच्या दीर्घकालीन आणि तत्त्वनिष्ठ भूमिकेचा पंतप्रधानांनी केला पुनरुच्चार
पंतप्रधानांनी, पॅलेस्टाईनच्या लोकांसाठी भारताची विकास भागीदारी आणि मानवतावादी मदत यावर प्रकाश टाकला
शांतता आणि स्थिरता लवकरात लवकर पुनर्प्रस्थापित करण्याच्या गरजेवर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली
Posted On:
28 OCT 2023 11:00PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह अल-सिसी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
यावेळी दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील सद्यस्थिती आणि या क्षेत्रावर आणि जगावर त्याचे होणारे परिणाम यावर चर्चा केली.
दोन्ही नेत्यांनी दहशतवाद, हिंसाचार आणि नागरिकांच्या जीवितहानीबद्दल आपली चिंता व्यक्त केली.
इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्द्यावर भारताच्या दीर्घकालीन आणि तत्त्वनिष्ठ भूमिकेचा पंतप्रधानांनी यावेळी पुनरुच्चार केला.
पॅलेस्टाईनच्या लोकांसाठी भारताची विकास भागीदारी आणि मानवतावादी मदत पंतप्रधानांनी अधोरेखित केली.
यावेळी दोन्ही नेत्यांनी शांतता आणि स्थिरता प्रस्थापित होण्याच्या तसेच मानवतावादी मदत सुलभ करण्याच्या आवश्यकतेवर सहमती दर्शविली.
***
S.Tupe/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1972799)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam