पंतप्रधान कार्यालय
दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारताने मिळवलेल्या विक्रमी 73 पदके आणि पदतालिकेतील स्थानाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
26 OCT 2023 4:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2023
दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारताने मिळवलेल्या विक्रमी 73 पदके आणि पदतालिकेतील स्थानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. जकार्तामधे 2018 साली झालेल्या स्पर्धेत भारताने 72 पदके जिंकली होती. तो टप्पा आता आपण मागे टाकला आहे. दिव्यांग खेळाडूंच्या बांधिलकी, दृढता आणि अतूट प्रयत्नांचेही पंतप्रधानांनी कौतुक केले.
एक्स वरिल आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले:
“दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारताने अभूतपूर्व 73 पदके मिळवत, विजयी घोडदौड कायम राखली आहे. जकार्ता 2018 दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडास्पर्धेतील आपला 72 पदकांचा पूर्वीचा विक्रम मोडून काढत एक अभूतपूर्व कामगिरी केली आहे!
हा महत्त्वपूर्ण क्षण आपल्या खेळाडूंच्या अथक निर्धाराला मूर्त रूप देत आहे.
आपल्या असामान्य दिव्यांग खेळाडूंसाठी जल्लोषपूर्ण मानवंदना. त्यांनी इतिहासात आपले नाव कोरले असून प्रत्येक भारतीयाचे हृदय प्रचंड आनंदाने भरून गेले आहे.
त्यांची बांधिलकी, दृढता आणि उत्कृष्टतेचा निर्धारपूर्ण प्रयत्न हे खरोखरच प्रेरणादायी आहेत!
ही ऐतिहासिक कामगिरी भविष्यातील पिढ्यांना प्रेरणादायी, मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून काम करेल.”
S.Tupe/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1971505)
आगंतुक पटल : 130
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam