पंतप्रधान कार्यालय

दिव्यांगांसाठीच्या आशियाई स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या 1500 मीटर-T11 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल ललिता किल्लाकाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 25 OCT 2023 9:41PM by PIB Mumbai

हँगझोऊ येथील दिव्यांगांसाठीच्या आशियाई स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या 1500 मीटर-T11 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल ललिता किल्लाकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

तिचा असामान्य पराक्रम आणि दृढ निश्चयाची त्यांनी प्रशंसा केली आहे.

पंतप्रधानांनी X  समाज माध्यमावर म्हटले आहे:

"ललिता किल्लाकाचे महिलांच्या 1500 मीटर-T11 स्पर्धेतील रौप्य पदक हा भारतासाठी अभिमानाचा क्षण. तिची अलौकिक कामगिरी आणि दृढ निश्चय खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. असेच उत्तमोत्तम यश मिळवून तिची यशाची कमान चढती राहो.” 

***

SonalT/RAgashe/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1971298) Visitor Counter : 66