पंतप्रधान कार्यालय

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या भालाफेक-एफ 37 स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या हॅनीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 25 OCT 2023 6:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2023

चीनमधील हांगझाऊ येथे आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा  2022 मध्ये पुरुषांच्या भालाफेक-एफ 37 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल हॅनीचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेमध्ये  पुरुषांच्या भालाफेक-एफ 37 मध्ये सुवर्णपदक मिळवून हॅनीची एक उत्कृष्ट कामगिरी!

त्याने अतुलनीय कौशल्य दाखवून  भारताला अमर्याद आनंद देत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

 

S.Bedekar/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1970999) Visitor Counter : 90