पंतप्रधान कार्यालय

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुष भालाफेक एफ 64 प्रकारात सुवर्णपदक पटकावत जागतिक विक्रम केल्याबद्दल सुमित अंतिलचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 25 OCT 2023 1:24PM by PIB Mumbai

चीनमधील हांगझाऊ येथे आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सुवर्णपदक पटकावत पॅरा आशियाई स्पर्धांमध्ये आणि या खेळामध्ये विक्रम केल्याबद्दल सुमित अंतिलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी वर पोस्ट केले:

''विलक्षण कामगिरी !
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये पुरुष भालाफेक एफ 64 स्पर्धेत सुमित अंतिल याने सुवर्णपदक पटकावत पॅरा आशियाई स्पर्धांमध्ये आणि या खेळामध्ये जागतिक विक्रम केला.
सुमित खरा चॅम्पियन आहे! त्याची विलक्षण कामगिरी त्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची आणि कौशल्याची साक्ष आहे
भारत हा विजय मोठ्या अभिमानाने साजरा करत आहे.”

***

SonlaT/SonalC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1970724) Visitor Counter : 73