पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या थाळीफेक प्रकारात सुवर्ण पदक पटकावणाऱ्या नीरज यादव याचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 24 OCT 2023 8:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 ऑक्‍टोबर 2023

 

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या थाळीफेक-एफ 54/55/56 प्रकारात सुवर्ण पदक पटकावणाऱ्या नीरज यादव याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

नीरज हा खऱ्या अर्थाने अजिंक्यवीर आहे असे सांगत पंतप्रधानांनी नीरजचा दृढ निर्धार आणि प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

एक्स या समाज माध्यमावर टिप्पणी करताना पंतप्रधान म्हणतात:

"नीरज हा खऱ्या अर्थाने अजिंक्यवीर आहे.

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या थाळीफेक-एफ 54/55/56 प्रकारात जबरदस्त असे सुवर्ण पदक पटकावल्याबद्दल नीरज यादव याचे अभिनंदन! त्याने मिळवलेले अभूतपूर्व यश, त्याचा दृढ निर्धार आणि प्रयत्न दर्शवते. त्याच्या या कामगिरीमुळे भारताचा ऊर अभिमानाने भरून आला आहे."

 

 

* * *

S.Patil/A.Save/D.Rane


(Release ID: 1970575) Visitor Counter : 128